pub-7425537887339079
ब्रेकिंग

शक्तीपेक्षा युक्तीने संकटांना सामोरे जा ..! जनजागृती वाहन पथकाने केले मार्गदर्शन!

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि.13

बदनापूर तालुक्यातील सायगाव (डोंगरगाव) येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आज पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना तर्फे जनजागृती वाहनाद्वारे सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार व स्वसंरक्षण इत्यादी विषयी व्हिडिओ चित्रफिती व्दारे माहिती देण्यात आली. यावेळी पथकातील कर्मचारी श्रीम. ज्योती राठोड, दामिनी पथक, जनजागृती वाहनाचे श्री. गौतम बोबडे व पोलीस मित्र रामेश्वर देशपांडे यांनी विविध कृतीतून व विद्यार्थी सहभागातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
यावेळी मोबाईल पाहणे वापरणे काळाजी गरज आहे पण काय पाहावे काय पाहू नये या तंत्रज्ञानाच्या मायाजालात अडकून न पडता चिकित्सकपणे वापर करून ज्ञान वृद्धी करावी. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता अभ्यासाचे विचाराचे व्यसन करावे व त्यात रममाण व्हावे. ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्यावी आणि आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून फसवणूक थांबवता येत किंवा आपल्या खात्यात अनावधानाने वा जाणूनबुजून आपल्या आर्थिक गुन्ह्यात अडकविण्यासाठी आपल्या खात्यात कोणी व्यक्तीने पैसे पाठवल्यास पैशाच्या मोहास बळी न पडता 1945 क्रमांकावर माहिती द्यावी.महिला सुरक्षा व अत्याचाराची घटना घडल्यास‌ त्वरीत 112 क्रमांक डायल करावा आणि तुमची फसवणूक वा संकटात सापडल्यास तुम्ही काय केलं असतं? यातून विद्यार्थ्यांना बोलतं केले.

— मुख्याध्यापक – पंढरीनाथ उनवणे

असे उपक्रम राबवून विद्यार्थी, पालकांना वा समाजाला या मायाजलाचे बरे वाईट परिणाम जनजागृती वाहनातील चित्रफिती व्दारे समजावून सांगण्याचा जालना पोलिस अधीक्षक कार्यालयाचा उपक्रम अनुकरणीय आहे. यामाध्यमातून एवढेच सांगेन की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा उंचावण्यासाठी वा मलिन करण्यासाठी वापर होत असेल तर सर्वांनी वेळीच सावध झाले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक राजेभाऊ मगर यांनी तर आभार एकनाथ तांबे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक रमेश रबडे, गोविंद पडूळ, बाबासाहेब पाझडे, रामकृष्ण पाटील, दिनकर लाड, विजय घनघाव,श्रीम. रंजना हिवरे, तसेच कर्मचारी अशोक मुगदल व प्रकाश गवारे यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे