pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ; सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यानाचे आयोजन

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.23 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त सोमवार दि. 26 जून 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता नूतन वसाहत येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीला प्रारंभ होणार आहे. ही दिंडी नूतन वसाहत येथील भाजी मंडई, शासकीय रुग्णालय मार्गे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जालना येथे जाणार आहे. याठिकाणी सकाळी 10.00 वाजता सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राचार्य, बी.वाय. कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles