ब्रेकिंग
लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील संभाव्य उमेदवारांना बँक खाते उघडण्याचे आवाहन
0
3
0
4
8
9
जालना/प्रतिनिधी,दि.15
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील खर्चासाठी संभाव्य उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. तरी संभाव्य उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडावेत, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवारांनी निवडणूकांच्या खर्चासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी किमान एक दिवस अगोदर स्वतंत्र बँक खाते उघडावेत, याकरीता सहकार्य करण्यासंदर्भात भारतीय रिजर्व बँकेचे कार्यकारी संचालक यांनी सुचना दिलेल्या आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
0
3
0
4
8
9