pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘नॅशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अवॉर्ड 23’ या पुरस्काराने भगवान धनगे यांना प्रदान.

कार्यक्रम पंचतारांकित वेलकम हॉटेल, ITC, द्वारका, नवी दिल्ली येथे पार पडला.

0 1 2 0 7 7

जालना/प्रतिनिधी,दि.2

शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा “नॅशनल एज्युकेशन ब्रिलायन्स अवॉर्ड 2023” हा पुरस्कार नुकताच भगवान धनगे यांना नवी दिल्ली येथील पंचतारांकित वेलकम हॉटेल, ITC, द्वारका, नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात दिला गेला आहे.
हा पुरस्कार त्यांना दिल्लीचे कॅबिनेट शिक्षण मंत्री मा.श्री राजकुमार आनंद व मा.श्री संतोष बागरोडिया माजी संसद सदस्य, राज्यसभा व भारताचे माजी कोळसा मंत्री तसेच NEBA चे मुख्यकार्यकारी अधिकारी गौतम गौरव यांच्या हस्ते देण्यात आला. भगवान धनगे हे जालना जिल्ह्यातील शरद शिक्षण व संशोधन संस्था,जालना संचालित प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा या शाळेत गेली 27 वर्षांपासून कार्यरत आहे.

(NEBA) 2023, जयपूर
यांच्यातर्फे दिला जाणारा भारत देशाच्या सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षण पुरस्कार आहे. ‘राष्ट्रीय शिक्षण ब्रिलायन्स अवॉर्ड्स 2023’ हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी, योगदानाबद्दल आणि प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांच्यावर विश्वास ठेवत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.
याबद्दल भगवान धनगे यांचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 7 7