pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचे यश चंपतराव डाकोरे पाटिल

दिव्यांगांच्या संघटित लढ्याला सोशल मिडिया पत्रकार यानी आपल्या लेखणीतून जागृतीमुळे महाराष्ट्र शासनाने दिव्यांगाच्या मानधनात अल्पशा प्रमाणात वाढ,

0 3 8 3 5 2

नांदेड/प्रतिनिधी, दि.18

महाराष्ट्रातील दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधाराना मिळणाऱ्या दिड हजारात जगने शक्य नसल्यामुळे कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग संघटनेने आप आपल्या प्ररिने अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे सनदशीर आंदोलन करून शासन प्रशासन जागे केले.
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा,विभागीय आयुक्त,दिव्यांग आयुक्त, मंत्रालय, विधीमंडळात अनेक निवेदने मोर्चे,भिक मांगो आंदोलन, अर्धंनग्नअवस्थेत भिक मागो आंदोलन,शेवटि न्याय हक्क देता येत नसेल तर जंगली जनावरांसारखे जिवन जिने शक्य नसल्यामुळे आम्हा दिव्यांचा ना न्याय हक्क द्या नसेल तर दिव्यांचा ना स्व–ईच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून बे-मुध्दत धरने आंदोलन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली आंदोलन केलेल्या चळवळीची दखल सोशल मिडिया,दै.मिडीया, न्यूज चॅनल, सर्व न्युज ने दिनदुबळ्याच्या समस्या कुंभकर्ण शासन प्रशासनास कळावी म्हणून प्रसिध्दी द्वारे कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्याचा केलेल्या प्रयत्नाला अल्प प्रमाणात का होईना दिव्यांगाना मिळणाऱ्या मानधनात दरमहा एक हजाराची वाढ झाली त्यांचे श्रय महाराष्ट्रातील शुरविर प्रराक्रमी लढाईत संघर्षात सामिल झालेल्या तमाम दिव्यांगाना व चळवळीची बातमी देणाऱ्या खऱ्या ईश्वररूपि दिनदुबळ्याच्या लढाईला सहकार्य करणाऱ्यांचा मी आभारी आहे असेच सहकार्य चळवळीत राहावे व महाराष्ट्रातील दिव्यांग संघटनेने संघटिपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे