मनसेच्या शर्मिलाताई ठाकरे यांनी प्रितम तांडेल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच मनसेच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे गव्हाण विभाग उपाध्यक्ष कु प्रितम पंढरीनाथ तांडेल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाराष्ट्र सैनिकांची माऊली सौ.शर्मिला वहीणी राजसाहेब ठाकरे यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशिर्वाद घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शर्मिला वाहिनी यांनी कु. प्रितम पंढरीनाथ तांडेल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.मनसेचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कु. प्रितम पंढरीनाथ तांडेल यांची ओळख असून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेउन तर अनेक जणांनी व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कु. प्रितम तांडेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.