भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक एलसीबी चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

जालना/प्रतिनिधी, दि.28
तेरा वर्षीय शाळकरी मुलांचे अपहरण झाले असता पालकाच्या सतर्क पणाने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना तात्काळ माहिती दिली असता या प्रकरणात देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष्य नोपानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे श्री रामेश्वर जे खानाळ यांच्या संपूर्ण टीमने अपहरण करत्या मुलाची 11 तासात सुटका केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक एलसीबी चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका संध्या संजय देठे. चिटणीस सौ ममता कोंडीयाल. जिल्हा सरचिटणीस स्नेहल जोशी .उपाध्यक्ष सौ वैशाली बनसोड .जालना तालुका अध्यक्ष सौ शारदा काळे .सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष दीपाताई बिन्नी वाले .जिल्हा कार्यकारणी सदस्य कविता नागवे आदींची उपस्थिती होती