मसाज जालना शाखेचे सचिव पंडित तडेगावकर यांच्या वडिलांचे निधन, मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

जाफराबाद/विशाल देशमुख, दि.15
तडेगाव ता. भोकरदन येथील शेषराव देशमुख तडेगावकर ( 89) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी पूर्णा नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे, दज्ञेश्वर शिवालय संस्थान दहेगाव (ने)चे प्रमुख हभप सुदाम महाराज आदमाने ,संगमेश्वर संस्थान मूळचे हभप प्रल्हाद महाराज कड, जिप सदस्य डॉ.चंद्रकांत साबळे,विविध गावचे सरपंच,वारकरी संप्रदायाचे भक्तगण, शिक्षण व सर्व क्षेत्रातील व नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. झालेल्या शोकसभेत त्यांच्या जीवन चरित्रातील विविध आठवणी यावेळी व्यक्त केल्या.त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून मराठवाडा साहित्य परिषद जालना चे सचिव पंडितराव तडेगावकर यांचे ते वडील तर मसापच्या केंद्रीय संचालिका डॉ. संजीवनी तडेगावकर यांचे ते सासरे होते.
__________________________

