पळसा शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शरद माने यांची बिनविरोध निवड

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.9
शाळेतील विकासासह अडी अडचणी सोडवणे शैक्षणिक क्षेत्रातील सुविधेवर लक्ष ठेवण्यासाठी शासनाकडून प्रत्येक गावात दोन वर्षांसाठी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते. कार्यकाल संपलेल्या ठिकाणी नवीन अध्यक्ष पदासाठी काही ठिकाणी स्पर्धा लागत असून निवडणूकीची वेळ निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात येत आहे.
सहा हजारांहून अधिक लोकसंख्येसह निवडणूकीच्या वेळेपुरतेच राजकारण अशी ओळख निर्माण करणा-या मौजे पळसा ता.हदगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारणीची निवड मुख्याध्यापक माने यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत व गावक-यांनी एकाविचाराचे दर्शन दाखवित अतीशय खेळीमेळीच्या वातावरणात एक एक वर्षाकरिता अध्यक्ष उपाध्यक्ष करीत बिनविरोध संपन्न झाली. त्यामध्ये सुरवातीला शरद मधुकरराव माने यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून वंसत ग्यानोबाराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दुसर्या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. पिराजी गोविंदराव पवार उपाध्यक्ष विजय प्रल्हाद घंगाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे ,बिट जमादार श्याम वडजे, सरपंच आशाताई प्रभाकर धाडेराव, पोलीस पाटील काशीराव मस्के, माजी सभापती कोंडबाराव दवणे , माजी उपसरपंच डॉ. पिराजी पवार,संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य गजानन पंजाबराव मस्के ,माजी सरपंच रणजित कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कामाजी निमडगे , ज्ञानेश्वर हाराळे, यांच्यासह शंकरराव मुळे, सतिश मुळे, सुर्यकांत चिंचोलकर, रमेश गव्हाणे, दिलिप माने, प्रियंका घंगाळे , विकास कांबळे , कांता चिंचोलकर गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी शिक्षण प्रेमी शिक्षक शिक्षीका उपस्थित होते. बिनविरोध नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे ग्रामपंचायत कार्यालयासह गावक-याकडुन समाधान व्यक्त होत आहे. बिनविरोध निवडीबद्दल उपसरपंच तथा उद्योगजक संजय काला ,चेअरमन विलासराव मस्के, तंटामुक्त अध्यक्ष दत्तराव चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे यांनी नवनिर्वाचित शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीला शुभेच्छा दिल्या.