pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान

0 3 2 1 6 7

जालना/प्रतिनिधी,दि.14

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी उत्साहात मतदान पार पडले. एकूण  69.18 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देत प्रशासनाच्या आवाहनाला दाद देऊन मतदारांनी उर्त्स्फूतपणे मतदान केले.

सोमवार, दिनांक 13 मे 2024 रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जालना लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

जालना- एकूण मतदार संख्या  पुरुष 1,73,975, महिला 1,54,222 व इतर 35 असे एकूण 3,28,232 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या पुरुष 1,09,103, महिला 90,777 व इतर 6 असे एकूण 1,99,886 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 62.71 टक्के, महिला 58.86 टक्के व इतर 17.14 टक्के अशा एकूण 60.90 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

बदनापूर- एकूण मतदार संख्या  पुरुष 1,68,340, महिला 1,53,548 व इतर 5 असे एकूण 3,21,893 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,012, महिला 1,06,135 व इतर 1 असे एकूण 2,31,148 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 74.26 टक्के, महिला 69.12 टक्के व इतर 20 टक्के असे एकूण 71.81 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

भोकरदन –एकूण मतदार संख्या पुरुष 1,62,987, महिला 1,49,038 व इतर 0 असे एकूण 3,12,025 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,23,516, महिला 1,08,176 व इतर 0 असे एकूण 2,31,692 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 75.78 टक्के, महिला 72.58 टक्के व इतर 0 टक्के असे एकूण 74.25 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सिल्लोड – एकूण मतदार संख्या पुरुष 1,79,017, महिला 1,60,826 व इतर 4 असे एकूण 3,39,847 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,25,929, महिला 1,08,108 व इतर 2 असे एकूण 2,34,039 मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.34 टक्के, महिला 67.22 टक्के व इतर 50 टक्के असे एकूण 68.87 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

फुलंब्री – एकूण मतदार संख्या पुरुष 1,84,985, महिला 1,66,819 व इतर 4 असे एकूण 3,51,808 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,31,188, महिला 1,10,860 व इतर 1 असे एकूण 2,42,049 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 70.92 टक्के, महिला 66.46 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 68.80 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

पैठण – एकूण मतदार संख्या पुरुष 1,64,802, महिला 1,48,963 व इतर 4 असे एकूण 3,13,769 मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या पुरुष 1,21,127, महिला 1,01,278 व इतर 1 असे एकूण 2,22,406 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 73.50 टक्के, महिला 67.99 टक्के व इतर 25 टक्के असे एकूण 70.88 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे