pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सुरंगली परीसरात पाऊस पिकांना जिवदान युरीया खतांची टंचाई कायम युरीया उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

0 3 8 4 4 1

भोकरदन/संजीव पाटील,दि.16

भोकरदन तालुक्यातील सुरंगली परीसरात काल रात्री गोकुळाष्टमी शुक्रवारी रात्री पाऊस झाल्यामुळे सोयाबीन,मका, उडीद मूग या पिकांना जिवदान मिळाले आहे. परंतु सध्या भोकरदन तालुक्यातील युरीया खतांची टंचाई कायम आहे.भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील विनायक कृषी सेवा केंद्रांवर युरीया रास्त भावात 265 रुपये प्रमाणे एका शेतकऱ्यास एक गोणी आधार कार्ड वर मिळत आहे. ती पुरेशी नाही.पोलीस‌ बंदोबस्तात युरीया खतांचे वाटप केले जात आहे. कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी नी यांनी शेतकऱ्यांना मुबलक युरीया रास्त भावाने उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सुरंगली परीसरात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती. काही शेतकऱ्यांनी मका , सोयाबीन पिकांना पाणी देणे सुरू केले होते. पावसाळा सुरु होऊन जवळपास अडीच महिने झाले असले तरी या भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.नदी नाल्याला मोठा पुर न आल्यामुळे मध्यम प्रकल्प जुई धरणा मध्ये फक्तं 15% जल साठा शिल्लक आहे. जुई धरता वर भोकरदन शहरासह सुरंगली , पिंपळगांव रेणुकाई,सिपोराबाजार ,खानापुर, वाकडी कोठडी, कल्याणी, करंजगाव,मुर्तड पळसखेडा,देहड इत्यादी गावांसह 25 गावांचा पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे