मल्हार महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ पडेगाव निवेदनाद्वारे मागणी

आनिल वाढोणकर/ छ. संभाजीनगर,दि.15
मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर यांच्या आदेशानुसार व राज्य संघटक रामेश्वर लव्हाळे तथा मराठवाडा अध्यक्ष संजयजी फटाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेळी मेंढी विकास महामंडळाच्या मार्फत बंद असलेल्या पशुखाद्य व औषधी शेळी व मेंढी यांच्या एक रुपयात विमा पूर्वत सुरू करण्याबाबत व तसेच शेळी मेंढी विकास महामंडळाच्या वतीने पशुखाद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असणारे आरोग्यवर्धक खाद्य व औषधी वितरित करण्यात येत असते परंतु गेल्या काही दिवसांपासून सदरील आरोग्यवर्धक खाद्य पशुपालकांना वितरित करण्यात आला नाही यामुळे प्रश्न आरोग्यांच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ पडेगाव यांचा माध्यमातून मल्हार महासंघाच्या वतीने महसूल व पशुवर्धन मंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील निवेदन देण्यात आले यावेळी मल्हार महासंघाचे मेंढ्या पाळ जिल्हाध्यक्ष साईनाथ मोरे लक्ष्मण सोनवणे रामेश्वर साबणे गणेश सोनवणे संतोष कोल्हे अनिल कोल्हे तुकाराम धर्मे दामोदर सोनवणे हरिभाऊ गौताडे चिलू करडे व आदी मेंढ्या पाळ बांधव उपस्थित होते