ग्राम पंचायत कार्यालय, उंचाडा च्या वतिने जिल्हा परिषद शिक्षकांचा सत्कार करण्यात आला….!

हदगाव/प्रतिनिधि, दि.5
सविस्तर वृत्त असे की,ग्रामपंचायत कार्यालय,उंचाडा च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा येथील सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी व यात्रा महोत्सवानिमित्त मौजे कवाना ता.हदगाव जि.नांदेड येथे भव्य शालेय लेझीम स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा येथील संघ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या हिरहिरीने सहभागी झाला होता.या स्पर्धेत जवळपास 13 संघ सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक उंचाडा येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री गणेशराव गाढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथक प्रमुख श्री सुर्यवंशी सर यांनी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यां कडून चांगल्या पध्दतीने सलग आठ-दहा दिवस सराव घेवून प्रस्तुत स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धे मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा या संघाला व्दितीय क्रमांकाचे 16555/- रूपयाचे बक्षिस मिळाले.
शाळेतील शिक्षकांने चांगल्या पध्दतीने विद्यार्थ्यांकडून सराव करून घेऊन स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाचे बक्षीस जिंकून दिल्या बद्दल उंचाडा नगरीचे युवा नेते तथा सरपंच संघटनेचे जिल्हा उपध्यक्ष श्री विलासराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन शाळेतील सर्व गुणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याचा आणि सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्याचा निर्णय घेतला
त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री गजानन निल्लेवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेशराव गाढे,श्री मारोतराव सुर्यवंशी,श्री शिवाजी राठोड, श्री मारोती राठोड, श्रीमती राजकन्या येणुरे, कुमारी ऐश्वर्या पौळ, शालेय पोषण आहार कर्मचारी श्रीमती आनुसया चव्हाण, श्रीमती महानंदाबाई निल्लेवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
युवा नेते श्री विलासराव चव्हाण यांच्या कडून यावेळी शाळेतील सर्व गुणी विद्यार्थ्यांना मिठाई चे वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी श्री विलासराव चव्हाण, उपसरपंच श्री दिनकरभाऊ चव्हाण, श्री पांडुरंग कदम,व्हाईस चेअरमन श्री संभाजी पाटील, श्री ज्ञानेश्वर गणेशराव चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष श्री अरविंदभाऊ चव्हाण, श्री बाबारावजी चव्हाण,श्री ज्ञानेश्वर दिगांबर चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी उपाध्यक्ष श्री श्याम पाटील चव्हाण,श्री ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण(माऊली),श्री विठ्ठलराव मगर,श्री जनक निल्लेवार, श्री संदिप चव्हाण,
सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुरजभाऊ चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास कोळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री यु पी चव्हाण सरांची विशेष उपस्थितीती होती.