मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान जालना च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप

काजळा/प्रतिनिधी, दि.22
आज ( दि.21) वार शुक्रवार या दिवशी प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा ता. बदनापूर जि. जालना या शाळेत मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान जालना च्या वतीने शालेय किट चे वाटप करण्यात आले. या जवळपास 300 विद्यार्थी शिक्षण घेतात. यात काही विद्यार्थी अनाथ, भूमीहीन आहेत व बाकी काही कामगारांची मुले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाही आशाना यावेळी दप्तर, 1 रेघी/2 रेघी/4 रेघी वह्या, कंपास पुस्तक, चित्रकला वही, कलर असे साहित्य वर्गानुसार वाटण्यात आले.
आज इयत्ता – 5 वी ,6 वी, 7 वी,8 वि, 9वी, 10 वी पर्यंत एकूण 13 किट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत गुजर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
आपणही 300 रु देऊन एका मुलाच्या खांद्यावर दप्तर यावे म्हणून मदत करू शकता