२९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अंगणवाडी सेविका मंदा म्हात्रे व शंकूतला पाटील सेवानिवृत्त.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरण तालुक्यातील गोवठणे गावातील अंगणवाडी सेविका मंदा श्रीराम म्हात्रे (मंदा काकू) व शकुंतला नरेश पाटील (शकून बाय )या दोघेही २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर अंगणवाडी सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत.२९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना आपल्या गावातील बऱ्याच लहान मुलांना या दोघेही अंगणवाडी सेविकांनी नुसते प्राथमिक शिक्षण दिले नाही तर, त्यांचे आरोग्य सांभाळले, त्यांना सकारात्मक बनविले, अ म्हणजे अन्न,आ म्हणजे आरोग्य कसे सांभाळायचे याचे धडे दिले.लहान मुले अक्षरशा वर्गात झोपायची,शी सु करायची,पण कधीच तक्रार नव्हती हया माऊलींची.आज नवीन पिढीतील कितीतरी जण शिक्षण घेऊन, तब्बेत सांभाळून, समाजात मानाने वावरतात. आणि त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या हया दोन माऊलींचा मंदाबाय , व शकूनबाय यांच्या खारीचा वाटा आहे, होता आणि राहील. अशा हया दोघी गोवठणे गावातील असून सेवानिवृत्ती नंतरचे त्यांचे आयुष्य आणि आरोग्य सुंदर, चांगले रहावे अशी प्रार्थना सर्वांनी ईश्वरा कडे केली आहे.हा कार्यक्रम उरण बीजेपी महिला मोर्चा अध्यक्ष राणीताई सुरज म्हात्रे यांनी आयोजित केला होता. सेवानिवृत्त वेळी अनेक महिला, ग्रामस्थ व उपस्थितांना अश्रू अनावर झाले.