श्री हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बावन्नवा वर्षाच्या निमित्य येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण किर्तन सोहळा कुंचोली येथे काल्याच्या किर्तन महाप्रसादाने उत्साहात संपन्न

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.3
नायगाव तालुक्यातील कुंचोली या. नायगाव येथे गत बावन वर्षापासुन चालु असलेला या सप्ताहानिमित्त थोर संत श्री तुळशिराम महाराज , श्री धुंडा महाराज देगलूरकर, जगद्गुरु श्री नराशाम महाराज येवती,श्री डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुंचेली नगरीत बावन्नवा अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा अनेक कार्यक्रमांचे आयोजन दि.२७ जानेवारी २०२५ ते दि.०३ फेब्रुवारी २०२५ रोजी काल्याच्या किर्तन हभप किसन महाराज बरबडेकर यांच्या किर्तन व महाप्रसादाने संपन्न झाली.
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा श्रीची पुजा काकडा आरती सकाळी ७ ते १०.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १०.३० ते १२ गाथा भजन दूपारी ४ ते ५ प्रवचन सायं.५ ते ६ हरीपाठ रात्री ८ ते १० हरी किर्तनाचा रात्री १० नंतर हरी जागर होईल
ज्ञानेश्वरी व्यासपिठ:– शिवाजीराव पा.इंगळे खानापूर, ज्ञानेश्वर पा शिंपाळे, चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर,
गाथा प्रमुख:– बाबुराव पाटिल टाकळी,
हरिपाठ प्रमुख:–गंगाजी पा.भोसले खतगाव,
काकडा प्रमुख:–हनमंत महाराज तळेगाव
मृदगाचार्य:–विश्वेश्वर महाराज कोंलबिकर, तुकाराम जाधव मोकासदरा
गायनाचार्य:–बाबुराव पाटिल टाकळी,गंगाजी पा.भोसले खतगाव, रमेश पाटिल, साईनाथ पाटील खैरगाव, बाबुराव पाटिल राजुने खतगाव समस्त भजनीं मंडळ कुंचोली
नामवंत किर्तनकार श्री हभप त्र्यंबक महाराज नांदगावकर
हभप.विष्णुदास महाराज तांदळीकर, हभप.दिंगाबर महाराज गडगेकर, हभप.हनमंत महाराज किनीकर,हभप.दता महाराज वळसंगवाडीकर , हभप.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर,
हमप.वासुदेव महाराज कोंलबिकर, हभप.किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे किर्तन महाप्रसादाने अति उत्साहात संपन्न झाला
कुंचोली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊन भक्तीत तल्लीन होऊन महाप्रसादाने तृप्त झाले.
असे प्रसिध्दी हनुमान मंदिर समिती कुंचोली गावकऱ्यांच्या वतीने प्रसिध्दी दिली