pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न !

0 1 7 4 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने २८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे “है तैयार हम” महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते नागपूर येथे उपस्थित राहावेत या संबधित आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी शेलघर येथे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आढावा बैठकीसाठी रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस, सहप्रभारी राणी अग्रवाल, सहप्रभारी श्रीरंग बरगे हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या आढावा बैठकीत कोकण पदवीधर मतदार नोंदणीच्या आढावा घेण्यात आला व अजून जास्तीत जास्त पदविधर नोंदणी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. तसेच महिना भरात सर्व तालुक्यात बि. एल. ए. नियुक्त झाले, पाहिजेत असे सांगण्यात आले. जनजागरण यात्रेच्या नियोजनाची बैठक १० जानेवारीला घेण्याचे ठरविण्यात आले. कर्जत तालुक्यातील नेरळचे उद्योजक आनंद मोडक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच बरोबर महाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये महाड तालुका अध्यक्षपदी अफजल चांदले, इंटक तालुका अध्यक्षपदी सुभाष खोपकर, युवक तालुका अध्यक्षपदी अजित सुतार, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी महम्मद अली कासीम लाडगे, महाड तालुका कार्याध्यक्ष पदी श्रेयस गांधी व इम्तियाज कादरी यांची तर नाते विभागीय अध्यक्षपदी बबन मारुती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. रायगड जिल्हा पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्या पर्यावरण पूरक १ लाख पिशव्या वितरणाचा शुभारंभ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बैठकीत मार्तंड नाखवा, प्रतिप पाटील, सागर जाधव, आनंद मोडक यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीसाठी सर्व तालुका अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, मिलिंद पांडगांवकर, अखलाख श्रीलोत्री, किरीट पाटील, वैभव पाटील तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे