pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ओएनजीसी ने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार. – वैभव कडू

0 1 7 4 1 1

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.9

दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 3 वाजल्या पासून उरण तालुक्यातील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीतून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑईल (घातक रसायन) सोडण्यात आले. या केमिकल युक्त तेलाने कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती शिवाय हे तेल गळती नाल्यावाटे शेतात व समुद्रात पसरले त्यामूळे प्रचंड प्रमाणात शेतक-यांचे व मच्छीमार बांधवाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना समजताच नागाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी घटना स्थळाची पाहणी केली. सदर बाब त्यांनी शासकीय अधिकारी व ओएनजीसीच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. उरणचे तहसिलदार उद्धव कदम, मंडळ अधिकारी अनिल पाटील,पोलीस अधिकारी एपीआय होलगे,ओएनसीसी प्रशासनाचे ऑपरेशन हेड एस.के. त्रिवेदी, जनरल मॅनेजर आर के सिन्हा यांनी घटनेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान घटना स्थळी मांगीण देवी मंदिरात महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी, मच्छीमार व ग्रामस्थांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली. यावेळी वैभव कडू म्हणाले की 15 दिवस अगोदर ओएनजीसी प्रशासना च्या भोंगळ व गैरकारभाराविरोधात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय, प्रदूषण मंडळ, तहसील कार्यालय उरण आदि ठिकाणी पत्रव्यवहार करून मुजोर ओएनजीसी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही,ओएनजीसी कंपनीतून दोन महिन्यात ही तिसरी तेळ गळतीची घटना घडली आहे.अशीच तेल गळती होऊन यापूर्वी तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.जर पुन्हा अशीच घटना घडून जिवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण ? शेतकरी, मच्छीमारांना नुकसान भरपाई देणार कोण ? आणि कधी देणार ? ओएनजीसी प्रकल्पांत परप्रांतीयांचा भरणा आहे. स्थानिक भूमीपुत्रांना, बेरोजगारांना नोकरी देणार तरी कधी ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी यावेळी शासकीय अधिकारी,ओएनजीसी अधिकारी यांच्यासमोर उपस्थित केला. पुन्हा तेल गळती होणार नाही. वायू प्रदूषण होणार नाही.याची ओएनजीसी प्रशासनाने दक्षता घ्यावी. शेतकरी व मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. स्थानिक बेरोजगारांना नोकरी दयावी, नोकरभरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे. आदि मागण्या वैभव कडू यांनी शासकीय अधिका-यांसमोर तसेच ओएनजीसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर बैठकीत मांडल्या. यावर उरणचे तहसिलदार उद्धव कदम यांनी ग्रामस्थांची ओएनजीसी प्रशासन सोबत चार दिवसात बैठक लावण्याचे बबूल केले. ओएनजीसीने योग्य ती खबरदारी यापूढे घ्यावेत अशा सूचना तहसीलदार उद्धव कदम यांनी ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी उपस्थित ओएनजीसी कंपनीचे ऑपरेशन हेड एस के. त्रिवेदी व जनरल मॅनेजर आर.के.सिन्हा यांनी अशी चूक पुन्हा होणार नाही. तेल गळती होणार नाही याची दक्षता घेण्याचे मान्य केले. यावेळी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्या नाहितर तर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी महाराष्ट्र शासन व ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे