जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचाडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न….!

हदगाव/प्रतिनिधी, दि.28
सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक उंचाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती चे माजी सभापती श्री तुकारामजी चव्हाण याच्या शुभहस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते श्री विलासराव चव्हाण,(उपसरपंच दिनकर चव्हाण)
(व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील चव्हाण),
शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री गजानन निल्लेवार,उपध्यक्ष श्री विठ्ठल तांबारे,माजी अध्यक्ष श्री बाबारावजी चव्हाण, श्री विश्वास चव्हाण, पप्पू चव्हाण पत्रकार सुरज पाटील आदी उपस्थित होते.
या सांस्कृतिक महोत्सवात देशभक्ती वरील गित,लावणी,चित्रपटावरील गिते,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील गित,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रा वर प्रकाश टाकणा-या गिताचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता.यावेळी गावातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गाढे सर श्री सुर्यवंशी सर,श्री राठोड मारोती,सौ.येणुरे राजकन्या,कुमारी ऐश्वर्या पौळ,श्री शिवाजी राठोड यादीने परिश्रम घेतले.