pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन: ‘मी फकिराच्या लुटीच्या पैशातून गुटी प्यालेला कलावंत’

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी, दि.18

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी.वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमाचे पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर आधारीत प्रकाश टाकला ते बोलताना म्हणाले कीकल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही. त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो.”
अण्णा भाऊ साठे स्वतःची ओळख अशी करून देत असत. अण्णा भाऊ हे एक प्रतिभावान व्यक्ती होते म्हणून अण्णाभाऊंची ओळख करून देताना त्यांना एकाच पैलूने बघणं फार अवघड आहे. एखाद्या हिऱ्याला अनेक पैलू तसंच अण्णा भाऊंचंही आहे.लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत
अतिशय खडतर आयुष्य, कमालीचं दारिद्र्य या संघर्षाच्या भट्टीत स्वत:ला तावून सुलाखून काढणारे अण्णा भाऊ स्वत:ची ओळख करून देताना म्हणतात, “मी असा-तसा कलावंत नाही. फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला मी कलावंत आहे.”असे सुंदर असे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी.वाघमारे केले.
तसेच शाळेचे सांस्कृतीक विभागप्रमुख मा.वाय.बी.मदन.यांनी सुञसंचालन व आभारप्रदर्शन केले यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती.एस.बी.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव.,आर.एस.ठाकरे.,एस.बी.राऊत.,श्रीमती.एम.ए.खरात.,आदिची उपस्थिती होती…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे