उंचाडा येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.27
ग्रामदैवत कांलीका देवी च्या पावनभुमीने हदगांव तालुक्यात नेहमी सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविणारे गाव म्हणून ओळख निर्माण करण्या-या उंचाडा ता.हदगांव येथे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अंखड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात युवकासह महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उंचाडा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंखड हरिनाम सप्ताह व भागवत कथा मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने संपन्न झाले . रक्तामुळे जिव वाचवु शकतो. रक्तदान प्रत्येकाने करावेत यासाठी धार्मिक कार्यक्रमातुन रक्तदानाची जनजागृती करीत रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असल्याने रक्तदानाचे महत्त्व व गरज लक्षात घेऊन यानिमित्ताने गावक-याकडुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये गावातील तरुणांनी व महिलांनी रक्तदान करुन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
रक्तदानात सचिन बालाजीराव चव्हाण,बालाजी तातेराव चव्हाण,रत्नमाला बालाजी चव्हाण,शंकर तातेराव चव्हाण,वनिता शंकर चव्हाण,मारोती अशोकराव चव्हाण,शिवदास चव्हाण,एकनाथ मारोती चव्हाण,शंकर नारायणराव चव्हाण,सुदर्शन हरीभाऊ चव्हाण,
संगिता हरिभाऊ चव्हाण,अरूण श्रीराम चव्हाण,
प्रविण सोपानराव चव्हाण,पवन चव्हाण,आकाश निल्लेवार, यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.तर गावकऱ्यांनी अंखड हरिनाम सप्ताह रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमी प्रमाणे उस्फूर्त सहभाग नोंदवला.