ब्रेकिंग
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
3
2
1
6
3
पुणे/प्रतिनिधी,दि.1
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
3
2
1
6
3