pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गरजुला मदतीसाठी आशेचा किरण ठरलेला अवलिया सहशिक्षक सटवाजी पवार यांची सामाजिक बांधीलकी

0 1 7 4 1 5

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.13

आजच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्याला किती कमाई करता येईल याकडे पाहत आहेत. पण त्यालाही काही जण याला अपवादही आहेत. शिक्षक क्षेत्रात कार्यरत असलेले जवळगाव ता.हिमायतनगर येथील सटवाजी पवार जवळगावकर हे सध्या हदगांव शहरांतील विवेकानंद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून आहेत. आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना समाजासाठी गरजुसाठी काही तरी देणे लागते.या उदात्त हेतुने प्रेरित होऊन कार्य करीत असलेल्या नांदेड येथील साईप्रसाद परीवार, हदगांव येथील आशादिप ग्रुप च्या सामाजिक कार्याला प्रभावित होवुन गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कमाईतील काही रक्कम गरीब गरजु कुटुंबातील अनाथ वडीलाचे छत्र नसलेल्या अनेक मुलीच्या विवाहासाठी संसार उपयोगी साहित्य घरपोच देत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.तर हदगांव हिमायतनगर तालुक्यातील अनेक मुलीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
राजकारणात पुढारी वर्गाकडुन खूप आश्वासन बघायला मिळत असतात. पण ते पुरे केले जात नाहीत. सहशिक्षक सटवाजी पवार यांनी गेल्या वर्षा अनेक मुलीच्या विवाहासाठी शिक्षणासाठी आर्थिक योगदान देत आपण पुढील वर्षीही अनेक मदत करणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे तो खरा करत स्वत पुढाकार घेत रयत प्रतिष्ठान स्थापन केला.त्यामध्ये दानशूर व्यक्तींना समाविष्ट करुन स्वत आर्थिक मदत करीत रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून हदगांव हिमायतनगर तालुक्यातील अनेक अनाथ वडीलाचे छत्र नसलेल्या कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी शिक्षणासाठी मदत करीत सामाजिक बांधीलक जोपासत आशेचा किरण ठरले आहेत. सध्या हदगांव हिमायतनगर तालुक्यातील अनेक मुली उच्च शिक्षण घेत असुन त्यांना मदत करीत त्यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पुर्ण होत असल्याने अवलिया सहशिक्षक सटवाजी पवार जवळगावकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

प्रत्येक मुलीला आपण उच्च शिक्षण शिकावे वाटते. विवाहात साहित्य असावे असे वाटते. ईच्छा असतानादेखील परीस्थीती आड येते.अशा वेळेत साईप्रसाद परीवार आशादिप ग्रुप सह रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहशिक्षक सटवाजी पवार जवळगावकर यांच्याकडुन केलेल्या मदती वाखाण्यासारखा असुन ही प्रेरणा ईतर दानशूर व्यक्तीनी घेण्याची गरज आहे.
सवीताताई विनोद निमडगे पळसेकर

मी शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहे.गावाकडे जमीनही आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडत आपल्या कमाईतील काहीतरी गरजुसाठी मदत केली पाहिजेत यासाठी हदगांव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे यांच्या प्रेरणेतुन गेल्या दोन वर्षांपासून मदत करीत आहे. पुढील काळातही रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असल्याने आणखी मदत करणार.
सटवाजी पवार जवळगावकर रयत प्रतिष्ठान अध्यक्ष

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे