pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पोस्ट ऑफिस कडून महिलांसाठी असलेल्या सन्मान बचतीसाठी जनजागृती

0 1 7 4 0 8

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.24

शासन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे.त्यामध्ये नांदेड जिल्हा डाककर पोस्ट ऑफिस विभागाच्या आदेशानुसार हदगांव तालुका अधिक्षकाच्या नियंत्रणाखाली शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये पोस्टमन यांच्या कडून महिलांसाठी अमृत काल सन्मान बचतीसाठी जनजागृती अभियान सुरू झाले आहे.
यामध्ये डाकघर पोस्ट ऑफिस विभागाकडून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत पत्र गुंतवणूक सुविधा उपलब्ध केली असून यामध्ये महिला व मुलींसाठी चक्र वाढ पध्दतीने प्रति वर्ष साडेसात टक्के ऐवढा व्याजदर असणार असुन दोन वर्षांच्या मुदतीसाठी दोन खात्याच्या तिन महिने अंतर आवश्यक आहे.सदरील रक्कम एक वर्षानंतर चाळीस टक्के रक्कम एकदाच काढता येणार आहे.तर अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही. सदरील अभियान एकतीस मार्च 2025 या कालावधीपर्यंत राहणार असल्याची माहिती पोस्ट ऑफिस विभागाकडून प्रत्येक गावातील पोस्टमन कडून जनजागृती व खाते काढण्याचे काम सुरू असुन चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांसाठी फायदेशीर असलेल्या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्यासाठी खाते काढण्याचे आवाहन केले जात आहे.
बरडशेवाळा येथे पोस्टमास्तर बालाजी चौधरी यांनी गावांमध्ये महिलांना जनजागृती करुन त्यांना पत्र दिले यावेळी गावातील महिला शालेय मुली गावातील नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे