राज्यातील महायुती सरकारने आज शुक्रवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्व समावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपा महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी योग्य समन्वय साधून राज्यातील सर्व घटकांना समोर ठेवून कल्याणकारी योजनांचा समावेश असलेला अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात वारकरी बांधवांचाही विचार करून वारकरी संप्रदाय महामंडळाला प्रति दिंडी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून महिला नवउद्योग करिता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप , मुलीना उच्चशिक्षण मोफ़त, शेतकर्यांसाठी नवनवीन योजना, अशा अनेक योजनांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे . त्यामुळे हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असून समाजातील वंचित वर्ग विकासाच्या प्रवाहामध्ये येईल असा विश्वास भाजपा जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी व्यक्त केला आहे.