जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत चैतन्य पाटील प्रथम

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा एच ओ सी काॅलेज रसायनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार तथा ॲथलेटिक्सचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळाराम पाटील यांनी केले. या प्रसंगी रायगड जिल्हा अँथलेटिक्स असोशिएशनचे सचिव प्रविण खुटारकर, दिलीप पाटील,यतिराज पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा पीलई काॅलेज तर्फे भरविण्यात आली होती. या स्पर्धेत सेंटमेरी स्कुल जे.एन.पी.टी स्कूल व एकलव्य अथलेटिक्स अकॅडमी जेएनपीटी – उरणचे विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १० वर्षा खालील मुलांमध्ये चैतन्य योगेश पाटील याने गोळाफेक क्रीडा प्रकारात गोळा ९. ०५ मीटर फेकून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर गोळाफेक क्रीडा प्रकारात ६. ४० मीटर गोळा फेकून हंसिका अजय तांडेल याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. साधना सर्वानंद यांनी गोळाफेक प्रकारात ६.६३ मीटर दूसरा क्रमांक पटकविला आहे. हर्षित प्रशांत घरत गोळाफेक प्रकारात ७ मीटर फेकून द्वित्तीय क्रमांक पटकविला .तसेच रेयान केतन तांडेल यांनी १०० मीटर धावणे तृतीय क्रमांक व ६० मीटर धावणे कीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच जीत नरेंद्र घरत यांनी लांच उडी कीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकविला.आणि जेसीका अजय तांडेल लाबं उडीत द्वित्तीय क्रमांक पटकविला .या सर्व विद्यार्थ्यांची पंढरपुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेंटमेरी जे.एन.पी.टी स्कूलचे मुख्याध्यापक राजेश अलफॉन्स,सुपरवायझर संदेश गावंड. सुपरवायझर ज्योती नायडू यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले.तसेच सेंटमेरी स्कूल जेएनपीटीचे क्रीडा माध्यमिक शाळा शिक्षक हरिश्चंद्र बोंडकर, राष्ट्रीय खेळाडू राम चौहान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सदर विजयी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.