0
3
1
5
0
6

जालना/प्रतिनिधी,दि.26
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची व
पक्षाच्या अंगीकृत असणार्या सर्व संघटनांची मजबूत बांधणी करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.जालना शहरातील शिवसेना भवन येथे शहरातील पदाधिकार्यांची संघटनात्मक
आढावा बैठक शनिवार २६ एप्रिल रोजीr संपन्न झाली. यावेळी या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास
दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले,जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, जिल्हा संघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,दुर्गेश काठोटीवाले, माजी नगरसेवक संदीप झारकंडे, संदीप नाईकवाडे यांची
उपस्थिती होती.यावेळी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
म्हणाले की, मागील काळात पक्षात झालेल्या फुटाफुटी नंतर रिक्त झालेली संघटनात्मक पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत
होईल. पक्ष संघटन बांधणी चांगली करुन आगामी निवडणुका आपण जिंकू.संघटनेच्या रिक्त जागा भरण्याबरोबरच महिला आघाडी, युवा सेना, दलित आघाडी,यासह सर्व अंगिकृत संघटनांच्या पदाधिकार्यांच्या नियुत्तäयाही प्रामुख्याने करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. पक्ष संघटन बळकट व
मजबूत असेल तर आपण कोणत्याही निवडणुका सहज जिंकू शकतो, असे ते म्हणाले.या बैठकीत दलित आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रविकांत जगधने, युवा सेनेच्या शहर प्रमुखपदी सुदर्शन चौधरी, युवा सेनेचा उपशहर प्रमुखपदी किरण तुम्मा,अल्पसंख्यांक आघाडीच्या शहर प्रमुखपदी वसीम खान, युवा सेनेच्या
उपशहरप्रमुख पदावर स्वराज बोर्डे यांची तर पक्षाच्या उपशहर प्रमुखपदी अजय रोडीये यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. यावेळी पदाधिकार्यांना
मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,नागरी प्रश्नावर शहर शाखेने आवाज उठवावा. शहरातील अनेक भागात १५-१५ दिवस
पाणी मिळत नाही. यावर केवळ एक दोन आंदोलन करून चालणार नाही तर त्यावर वारंवार आवाज उठवावा लागेल. प्रशासनावर दबाव निर्माण करुन जनतेचे प्रश्न
मार्गी लावावे लागतील. असे केल्याने जनतेच्या मनात आपल्या पक्षप्रती विश्वास निर्माण होईल. प्रत्येक पदाधिकार्यांनी आपल्या वार्डातील समस्या सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. याबरोबर रेशन कार्ड, आधार कार्ड, शासकीय योजना या सर्व
कामांसाठी जनतेला मदत केली पाहिजे असे आवाहन ही अंबेकर यांनी केले.यावेळी माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे, जगन्नाथ चव्हाण, महिला आघाडी
जिल्हा संघटक मंगल मेटकर, रविकांत जगधने, युवासेना शहर जिल्हाध्यक्ष राजू सलामपुरे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश राऊत, अंकुश राजेजाधव,
विभाग प्रमुख चेतन भुरेवाल, संतोष क्षत्रिय, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, विभाग प्रमुख सखावत पठाण, दर्शन चौधरी, अजय रोडीये, संतोष
क्षत्रिय, गणेश लाहोटी, वसंत घुगे, मंजुषा घायाळ, वसीम खान, संजय रत्नपारखे, नितीन बंसवाल, तुकाराम भुतेकर,जीवन खंडागळे, कृषी खिरे,
स्वराज बोर्डे, राजेश शेळके, तुळजाराम माधवले, चुनीलाल माधवले, रमेश तुंगेवार, गुड्डू खान, सुनील तोडकर, शेख खाजा, योगेश जाधव, राम कुलथे,
रामेश्वर कुरील यांच्यासह आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
5
0
6