साई विश्वनाथ दरबार येथे प्रतिष्ठापना दिन साजरा

पुणे/आत्माराम ढेकळे, दि.14
सालाबाद प्रमाणे यावर्षीही साई विश्वनाथ दरबार ,गंगाधाम येथे प.पु,सद्गुरु विश्वनाथबाबा यांच्या प्रतिष्ठापना व महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गंगाधाम परिसरातील ॐ साई विश्व या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वात प.पु.सद्गुरु विश्वनाथबाबा प्रतिष्ठापना दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी अभिषेक,भजन,आरती,महाप्रसाद,शेजआरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या पर्वकाळात बाबा स्व.संतोषजी रांका यांंची प्रतिमा प.पु.सद्गुरु संतनाथबाबा या नावे लावण्यात आली.बाबांच्या प्रतिमेचे सर्व भाविकांनी दर्शन घेतले.व आईमाता श्रीमती नीता संतोषजी रांका यांनी भाविकांनाआशिर्वाद दिले.या कार्यक्रमात प्रामुख्याने शिवसहायसिंग बनारसवाले,जयप्रकाश गुप्ता व लवकुश गुप्ता उर्फ एलके यांनी भजन,गीत सादर केले .निवेदन पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी केले..शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.