बोरखर गावात प्रथमच शिवजयंती निम्मित महिला बचत गटाकडून खाद्य महोत्सव

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा जंगदंब गृपतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केला.या सणाचे औचित्य साधून शिवशंभो महिला बचत गट,जय अंबे माता बचत गट,विठ्ठल रुख्मिणी बचत गट या महिला बचत गटातर्फे प्रथमच खाद्य पदार्थ्यांचे स्टाँल मांडण्यात आले होते. व्हेज आणि नाँनव्हेज सर्व पदार्थ या स्टाँल मध्ये मांडण्यात आले.पाणीपुरीपासून ते चिकन बिर्याणी पर्यंत सर्व पदार्थ होते. विशेष म्हणजे या मध्ये बचत गटातील सर्व महिला सहभागी होत्या. या बचत गटात विधंणे गृपग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा रोशन डाकी,अंगणवाडी सेविका, इतर महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. संध्याकाळच्या सत्रात हा कार्यक्रम असल्याने छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध यांनी सर्व पदार्थावर अक्षरक्षः ताव मारला.सर्व ग्रामस्थांनी या खाद्यपदार्थ आणि चवीचे कौतुक केले.हे स्टाँल मांडण्यापासून ते शेवटपर्यंत स्वच्छता राखून कार्यक्रम संपन्न केला.भविष्यात असे स्टाँल मांडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात केली आहे.अशा प्रकारे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.