दशरथरावजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण सोहळा आणि रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी 200 विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक अतिष ससाणे, सरपंच सुभाष दिघे, बहुजन समाज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पी.बी. खरात, डॉ. पल्लवी राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. पल्लवी राठोड यांच्या हस्ते प्रतिभा अतुल कासारे, स्मिता अनिल साळवे, ज्याती सिध्दार्थ येडे, पुजा सिध्देश्वर काकडे, वैशाली गणेशराव औताडे यांना बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात 200 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
दरम्यान दशरथरावजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दशरथराव जयराम सुरडकर यांच्या 23 व्या स्मृतीदिनानिमित्त 23 जनांणी रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडले. यावेळी शैलेश खैरे, संतोष हिवराळे, अरुण टाकसाळ, सतिष जगधने, बंडू पळसकर, शहाणे यांनी सहकार्य केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. दिलीप गीरी यांनी केले तर आभार शैलेश खैरे यांनी मानले.