100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेत (तालुका स्तर ) बदनापूर तालुका द्वितीय!

बदनापूर/प्रतिनिधी, दि.16
बदनापूर: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे मा. श्रीमती पंकजाताई मुंडे पालकमंत्री जालना यांच्या हस्ते 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम ही राज्य विभाग जिल्हा तालुका स्तरावरील एकूण 12,500 शासकीय कार्यालयामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली होती या मोहिमेमध्ये छत्रपती संभाजी नगर विभागातून गटशिक्षणाधिकारी कार्यालय बदनापूरचा तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल मा. क्षीरसागर डी. एन. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बदनापूर यांचा मा. श्रीमती पंकजाताई मुंडे पालकमंत्री जालना व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याबद्दल साहेबांचे ‘ live न्युज महाराष्ट्र’ टीमच्या वतीने अभिनंदन!



