pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

येनोरा शिवारात कपाशी-तुरीच्या शेतात गांजा पिकविला… अंदाजे 15 लाखाची गांजाची झाडे जप्त..

परतूर डीवायएसपी आणि आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई गांजा उत्पादक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

0 1 1 8 3 4

विरेगाव/ गणेश शिंदे दि.27

परतूर तालुक्यातील येनोरा येथील लक्ष्मण निवृत्ती बोराडे या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकांमध्ये गांजा पिकविण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे डीवायएसपी बुधवंत यांनी आपले पथक आणि आष्टी पोलिसांसह परतूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन धाड टाकली.
यावेळी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये लावण्यात आलेली गांजाची जवळपास 150 ते 175 लहानमोठी झाडे आढळून आले आहेत.
ही झाडे पंचनामा करून उपटून घेण्यात आली असून, ती जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. सोमनाथ नरके, सहायक फौजदार मुंडे, पोहवा. राठोड, राजु काळे, पोकाँ. शुभम ढोबळे, पांढरे, सज्जन काकडे, लोखंडे, इम्रान तडवी आदींनी ही कामगिरी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles