जालना शिक्षणाधिकारी यांचा प्रताप!
पात्रता नसतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली वैयक्तिक मान्यता ! माहिती अधिकारात बाब उघड !
जालना/प्रतिनिधी,दि.30
गेल्या २० वर्षापासून केली जातेय शासनाच्या तिजोरीची लूट ! जालना प्रतिनिधी (वार्ताहर) दि 30 कै नानासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय नजीक पांगरी ता बदनापुर येथील मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव प्रल्हाद पांडुरंग वाघ, तत्कालीन शिक्षणाधिकारी रमेश गवळी,रमेश तांगडे व वेतन अधीक्षक यांनी संगनमताने गेल्या २०वर्षापासून नियमबाह्य व बोगस नियुक्तीच्या आधारे शासनाची फसवणूक करून वेतनापोटी लाखो रुपयांची लूट केली आहे. सविस्तर प्रकरण असे की प्रल्हाद पांडुरंग वाघ हे कै नानासाहेब पाटील शिक्षण संस्था नाव्हा संचलित कै नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी ता बदनापूर या विद्यालयाचे कार्यरत मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव आहेत ते दि१८/६/२००५ रोजी सहशिक्षक या पदावर शाळेत रुजू झाले परंतु त्यांची शैक्षणिक पात्रता त्यावेळेस केवळ एम ए असताना तत्कालीन शिक्षणाधिकारी रमेश गवळी यांनी त्यांना कागदपत्राची पडताळणी न करता एम ए बी एड असे वैयक्तिक मान्यता आदेश पारित केले व त्यास तत्कालीन शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी सेवा सातत्य सुद्धा दिले याच दिवशी म्हणजे दिनांक १८/६/२००५ ला प्रल्हाद पांडुरंग वाघ यांनी बी एड या अभ्यासक्रमासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय आंबेजोगाई या ठिकाणी प्रवेश घेतला होता. एक व्यक्ती एकाच वेळेस दोन ठिकाणी हजर राहू शकत नाही ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली.याविषयी तक्रार प्रभाकर गणपत ढाकणे, दत्तू नामदेव एखंडे व गौतम कचरू खरात या कर्मचाऱ्यांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, एस आय टी प्रमुख चंद्रकांत फुलकुंडवार, सदस्य हारुण दातार यांच्याकडे केली आहे. बोगस नियुक्ती द्वारे हडपलेले वेतन व्याजासह शासन दरबारी जमा करून दोषींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता दोषीवर काय कारवाई होणार? याकडे सर्व शिक्षण प्रेमी व्यक्तींचे लक्ष लागून आहे
