मा. आमदार श्री. अर्जुनराव खोतकर यांच्या अध्येक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेमध्ये शहरातील पाणी पुरवठा संदर्भात आढावा बैठक.
नागरिकांच्या विविध समस्येंबाबत घेण्यात आली बैठक

जालना/प्रतिनिधी, दि.21
आज दिनांक २१.१२.२०२४ रोजी दुपारी १२.०० वा. मा. आमदार श्री. अर्जुनराव खोतकर यांनी जालना शहर महानगरपालिकेत शहरातील पाणी पुरवठा संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. संतोष खांडेकर, पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांनी शहरातील विविध समस्या मांडल्या. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी मा. आमदार श्री. अर्जुनराव खोतकर यांनी संबंधितांना सुचना दिल्या.
यावेळी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संतोष खांडेकर यांनी मनपात राबवित असलेल्या विविध योजना उपक्रमाबाबत माहिती दिली तसेच मनपाच्या आकृतीबंधास लवकर मान्यता मिळाल्यास तातडीने पदभरती करण्यात येवुन मनपाच्या कामकाजास मदत होईल असे सर्वांना संबोधित केले.
यावेळी मा. श्री. भास्कर अंबेकर, मा. श्री. अनिरुदध खोतकर, अॅड. श्री. विष्णु पाचफुले, मा. श्री. राजेश राऊत, मा. श्री. अशोक पांगारकर, मा. श्री. शाह आलम खान, श्री. सुनिल किनगांवकर, अॅड. श्री. भास्कर मगरे, श्री. राजेंद्र राख, श्री. पंडीतराव भुतेकर, श्री. अॅड. राहुल हिवराळे, श्री. रवि राऊत, श्री. अन्वर बेग, श्रीमती. संध्या ताई देठे, श्री. राजेद्र जाधव, श्री. गोपी गोगडे, श्री. संतोजी वाघमारे, श्री. संजय देठे, श्री. मयुर अग्रवाल, श्री. किरण गरड, श्री. शरद भांगदरे, श्री. राहुल रत्नपारखे, श्री. अर्जुन बजाज, श्री. अर्जुन गेडी, श्री. अभय कारवा, श्री. हेमंत ठक्कर तसेच पत्रकार श्री. कृष्णा पठाडे, श्री. सुरेश केशापुरे, श्री. संजय देशमुख, श्री. विजय मुंडे, श्री. महेश बुलगे व आदींची उपस्थिती होती.
तसेच यावेळी मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, शहरातील व्यापारी, नागरिकांची उपस्थिती होती.