महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्यशासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा – भास्कर (आबा) दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.24
राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरण करणेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत लाभ मिळणेसाठी जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांनी केले.
जालना शहरातील प्रभाग क्र.१ व ७ संभाजीनगर, शिवाजीनगर, श्रीक्रुष्ण नगर, जिजामाता कॉलनी, शिक्षक कॉलनी, ढवळेश्वर, सकलेचानगर, लक्कडकोट या भागातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चा नोंदणी चा शुभारंभ करताना भास्कर (आबा) दानवे म्हणाले की, राज्यशासनाने महिलांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या असून त्या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी महानगरपालिकाचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये सौ.संध्याताई देठे, बाबासाहेब कोलते, सौ.शुभांगीताई देशपांडे, सौ.अरुणा जाधव, अर्जुन गेही, अतिक खान, कपिल दहेकर, सुनील राठी, गोवर्धन कोल्हे, वसंत शिंदे, दत्ता जाधव, शिवराज जाधव, राजू जगताप, हसबे आप्पा, सौ.लताताई जगताप आदींची उपस्थितीत होती.



