pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका

0 1 7 4 0 9

औरंगाबाद/प्रतिनिधी,दि.01 

युवा वर्गाला मुख्य शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात राहून स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या मोफत अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगली मदत मिळणार आहे. सदर अभ्यासिकेची वेळ शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल तर शासकीय सुट्टीच्या दिवशी अभ्यासिका बंद असणार आहे.
प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण कार्यालयात सदर अभ्यासिकेसाठी प्रवेश अर्ज मिळत आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अभ्यासिकेसाठी प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.
अर्ज मिळण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील एस.डी.घुले, प्रमुख लिपिक (९९७०२६०२८४) यांच्याशी संपर्क करावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे