pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बामणडोंगरी गावच्या खोत बंधूंचे बांधकाम व्यवसायात पदार्पण प्रकल्पग्रस्तांना भूषणावह !

कामगार नेते महेंद्र घरत यांचे गौरवोदगार

0 3 1 0 3 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

सन १९८४ च्या लढयातून लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळवून देऊन भारत देशातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारा मोबदल्याचा इतिहास घडविला व याची मागणी देशभरातील शेतकऱ्यां कडून सरकारकडे सुरु झाली. परंतु अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपले भूखंड कवडीमोल किमतीत विकून भुखंडांच्या सोन्याची माती केली व आता अशी अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी दुसरीकडे चाकरी करण्याची पाळी आलेली आहे.

खोत बंधूकडे पाहून आज आनंद होत आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून आपला कंस्ट्रक्शनचा धंदा २५ ते ३० वर्ष सांभाळून आपले कुटुंबाचे स्थान उंचावत अनेक अडी- अडचणी आल्या तरी आपले भूखंड न विकता बांधकाम व्यवसायीकां कडून विकसीत न करता स्वत: खोत बंधूंनी पुष्पक नोड मधे आज भलामोठा अनंता पॅराडाईज चे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन केले. हे सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आदर्श उदाहरण नव्हे तर प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत आहेत, की मेहनत करण्याची तयारी व जिद्द असेल तर आपण सर्व क्षेत्रात अव्वल होवू शकतो. म्हणून खोत बंधूंचे हार्दिक अभिनंदन असे मत कामगार नेते महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून “ अनंत पॅराडाईज” चे भूमिपूजन झाले.यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी खोत बंधूंचे भरभरून कौतुक केले.या प्रसंगी पत्रकार माधव पाटील, शेकापनेते रामदास नाईक, विजय ठाकूर, किशोर पाटील, केसरीनाथ दापोलकर आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे