pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

घृष्णेश्वर मंदिर वेरुळ परिसरामध्ये आहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक स्थापन करा-अनिल वाढोनकार

0 1 1 8 0 8

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी, दि.3

प्रसिध्द व धार्मीक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे मंदिर म्हणून घृष्णेश्वर मंदिर वेरुळ संपुर्ण भारतात ओखळले जाते. बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक हे मंदिर आहे. शिल्प कलेचा उत्तम नमुना असणारे हे मंदिर प्राचिन आहे. तसेच या मंदिराची बांधणी, रेखीव कलाकृती अप्रतिम आहे.

या भव्य मंदिराचा जिर्णोध्दार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या या महान कार्यासाठी कृतज्ञता होण्याबरोबरच त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी घृष्णेश्वर वेरुळ मंदिरांच्या परिसरामध्ये अहिल्या मातेचे स्मारक स्थापन करण्यात यावे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महान लोककल्याणकारी कार्य पाहता तसेच लोकभावना विचारात घेता. अहिल्या मातेचे स्मारक या मंदिर परिसरात स्थापीत करावे अशी मागणी भाजपा सोशल मिडीया तालुका अध्यक्ष गंगापुर अनिल वाढोनकार यांनी मा. श्री. भागवतीजी कराड साहेब, केंद्रीय अर्थराज्य मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे    केली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 8

Related Articles