चिरनेर येथील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सद्स्यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

उरण /विठ्ठल ममताबादे,दि.13
रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीच्या शुभमुहृर्तावर उरण विधानसभा मतदारसंघातील उरण तालुक्यातील चिरनेर येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेल्या महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित सरपंच व नवनिर्वाचित सद्स्य यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचे तोंड भरून कौतुक केले व नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, यामध्ये चिरनेर ग्रामपंचायत थेट सरपंच भास्कर मोकल, नवनिर्वाचित सदस्य सचिन घबाडी,अरुण पाटील,दिपक कातकरी,प्रफुल्ल खारपाटील,समाधान ठाकूर,मृणाली ठाकूर,वनिता गोंधळी,समुद्रा म्हात्रे,निकिता नारंगीकर,भारती ठाकूर,यशोदा कातकरी,निलम चौलकर यांचा समावेश होता.
यावेळी शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शे. का.पक्षाचे सरचिटणीस सुरेश पाटील, काँग्रेसचे नेते व चिरनेर गाव तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, माजी ग्रामपंचायत सद्स्य धनेश ठाकूर,नितीन नारंगीकर,निनाद खारपाटील,चेतन चौलकर,अमेय ठाकूर,चंद्रकांत गोंधळी,सचिन पाटील,सौरभ पाटील व अलंकार ठाकूर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.