दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने १८ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन उरण मध्ये करण्यात आले आहे.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ – द्रोणागिरी गडाची सफाई आणि सजावट. दुपारी २ ते ५ – रक्तदान शिबीर ठिकाण विमला तलाव,सायं. ४ वा. – गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरने.सायं. ७ वा. – महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान ठिकाण विमला तलाव.सायं. ८ ते ९.३० – मशाल फेरी आणि दिपोत्सव ठिकाण विमला तलाव तर दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. – बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलवणे (विमला तलाव),सकाळी ८.०० वा. – शिवप्रतिमा पूजन (विमला तलाव),सकाळी ९.०० वा. – प्रतिमा मिरवणूक, शिवराज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान आणि मान्यवरांचे स्वागत तसेच शिवभोजन.सायंकाळी ४.०० वा. – गडावरून खाली उतरणे,सायं. ५.०० वा. निरोप समारंभ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित करण्यात आले आहे.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, सीआयएसएफ स्टाफ उरण, डाऊरनगर ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मित्र परिवार आदी संस्था विशेष मेहनत घेत आहेत.सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागच्या वतीने द्रोणागिरी गडावर पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करीत आहे. यंदाचे हे उत्सवाचे ५ वे वर्षे आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी, शिव भक्तांनी या शिवजन्मोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग कार्यकारी मंडळ आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कावले यांनी केले आहे.