चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
छावा प्रतिष्ठान चिरनेर,युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १४/५/२०२५रोजी उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव उरण तालुक्यात श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे.
सकाळी ९ वा. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन लक्ष्मण केणी व ज्योती केणी यांच्या हस्ते होणार आहे., सकाळी १० वा. श्री छत्रपती संभाजी महाराज जन्म सोहळा. यावेळी कु. सुजाता गोंधळी यांचे पाळणा गीत,सकाळी ११ वाजता माजी सैनिक सचिन कडू व अश्विनी कडू तसेच नितेश सिंग व मनीषा सिंग यांच्या शुभ हस्ते सत्यनारायनाची महापूजा, दुपारी ४ वा.शिवबंधू प्रेमी, समस्त शिवभक्त, ग्रामस्थ मंडळ चिरनेर उरण, प. पु. हभप हसुराम बाबा केळवणे यांचे शिष्य हभप अनिल महाराज (वशेणी), हभप गणपत महाराज (सावरसई) व शिष्यगण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक सोहळा, सायंकाळी ७ ते ८ महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर कातळपाडा, दुर्गा माता नवरात्र उत्सव चिरनेर, नवतरुण मित्र मंडळ कातळपाडा, अध्यात्मिक पौर्णिमा मंडळ चिरनेर भोम, अंकुश इलेव्हन, अर्जुन इलेव्हन, नरेंद्र महाराज सांप्रदाय चिरनेर, अभिनव मित्र मंडळ, निखिल स्पोर्ट्स, मंजित स्पोर्ट्स, छावा ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान, आकृती कलामंच चिरनेर, ओम साई संवाद मंडळ चिरनेर, संभा एक छावा ग्रुप भोम,विघ्नहर्ता मित्र मंडळ कातळपाडा,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आदी विविध सामाजिक संस्था श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणार आहेत.सर्व शिवभक्तांनी पालखी सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी व दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.