pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या  भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला  सतर्क राहण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

0 3 0 5 5 9

मुंबई, दि.10

हिंगोली परभणीनांदेडछत्रपती संभाजीनगरजालनाबीडवाशीम जिल्ह्यांसह मराठवाडाविदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भुकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमराठवाडाविदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भुकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकारीप्रांताधिकारीतहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहेत्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेतअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 0 5 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे