pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिवाळीपूर्वीच उरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजुर

कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

0 1 1 8 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी उरण नगरपरिषदच्या सर्व विभाग प्रमुखांची सानुग्रह अनुदानासंदर्भात बैठक घेतली.त्यावेळी नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर विविध कामांमध्ये घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागा बद्दल समाधान व्यक्त करून त्या योगे उरण नगरपरिषदची मान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न विचारात घेऊन दिवाळी सणापूर्वी उरण नगरपरिषदच्या कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून रक्कम रू. २७५००/– मंजूर केला आहे.यावेळी बांधकाम विभाग प्रमुख झेड आर माने यांनी संघटनेच्या मागणी प्रमाणे ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात मत मांडले.या मागणीला कामगार नेते संतोष पवार यांनी पृष्टी दिली.
यावर आपले मत मांडताना मुख्याधिकारी यांनी कर वसूलीचे काम जर अधिक चांगल्या पद्धतीने झाले तर आपण केलेल्या मागणीनुसार विचारही करण्याचा त्यांनी मानस असले बाबत व्यक्त केला आहे. त्याच वेळी कामगार नेते संतोष पवार यांनी उरण नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील बोनस दिवाळी पुर्वी मिळाला तर अधिक आनंद होईल अशी मागणी केली. मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील गेल्यावर्षी पेक्षा अधिक बोनस देण्या बाबत संबंधित ठेकेदाराला संबंधित अधिकारी यांना सुचना देण्याबाबत आदेश दिले आहेत.
कामगारांच्या उन्नती करीता मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले आहे आणि देत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानले.सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मंजुरी झाल्या बद्दलची माहिती मिळाल्याने उरण नगरपरिषदेमधील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये अतीशय आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4