कु. दिव्यल सविता वैभव भगतने कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता पटकविला एस एस सी परीक्षेत उरण तालुक्यात द्वितीय क्रमांक

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
जिद्द, मेहनत, प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उरण तालुक्यातील भेंडखळ गावची सुकन्या कु. दिव्यल सविता वैभव भगत होय. तिने कठोर परिश्रम घेत आकाशाला गवसणी घालत एस एस सी परीक्षेत सुयश संपादन केले आहे.कोचिंग क्लासेस नसताना देखील उत्तम मार्क विद्यार्थी मिळवू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणून आजकु. दिव्यल कडे पाहिले जात आहे. एक चांगला आदर्श तिने समाजात घातला आहे.भेंडखळ गावची गुणवंत सुकन्या कु. दिव्यल सविता वैभव भगत हिने एस एस सी बोर्ड परीक्षेत ९६.६% गुण मिळवून उरण तालुक्यात दिव्तीय क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच कोणतेही कोचिंग नसताना तिने हे यश संपादन केल्याबद्दल तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.