जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या छाननीमध्ये उमेदवारांचे 91 अर्ज अवैध

जालना/प्रतिनिधी,दि. 31
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.) आणि 103 भोकरदन विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी 258 उमेदवारांनी 382 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यापैकी बुधवार दि.30 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत उमेदवाराचे 91 अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
छाननी प्रक्रियेत 99-परतूर विधानसभा मतदार संघातील 18, 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघातील 12, 101-जालना विधानसभा मतदार संघातील 13, 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील 30 आणि 103- भोकरदन विधानसभा मतदार संघातील 18 नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारांना सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. विधानसभा मतदार संघ निवडणुकीचा निकाल शनिवार, दि. 23 नाव्हेंबर, 2024 रोजी जाहिर करण्यात येणार आहे.