पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा

जालना/प्रतिनिधी, दि.28
दिनांक 25 .9 .2024 रोज बुधवार ला दुसरबीड येथे गीतांजली मंगल कार्यालय या ठिकाणी श्री वसंतराव नारायणराव उदावंत व श्री बबनराव नारायणराव उदावंत यांच्या मातोश्री पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम पार पडला याप्रसंगी ह.भ.प .उमेश महाराज दशरथे श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग १५६५ मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ती ॥ १ ॥देह विसरे आपुला । जवळीं घेतां शिण गेला ॥ धृ ॥ दावी प्रेमभाते । आणि अंगावरी चढते ॥३ ॥ तुका संतापुढे ।पायी झोंबे लाडे कोडे ॥४ ॥ या अभंगावर फार सुरेख व मार्मिक अशा शब्दांमध्ये कीर्तन केले .अक्षरशा दोन तास सर्व उपस्थित जण कीर्तनात मग्न झाले होते . उदावंत घराण्याची आई वरील निष्ठा , संस्कार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसतात . महाराजांनी आवर्जून सांगितले की मी अनेक मोठी घरे पाहिली पण मोठ्या घरातील माणसाचे मनही तेवढेच मोठे असावे लागते हे मोठेपण मी उदावंत बंधूंमध्ये बघितले या घराण्याचा व महाराष्ट्रातील साधुसंतांचा असा ऋणानुबंध आहे की या दुसरबीड नगरीतून जाणारा एकही साधू संत उदावंत बंधूंच्या घरी भेटून गेल्याशिवाय राहत नाही .जणू हे घर संतांचे जंक्शनच आहे असे म्हणायला वावगे ठरणार नाही . या व अशा अनेक प्रसंगाची आठवण महाराजांनी आपल्या कीर्तनातून करून दिली . उपस्थित सर्व भाविकांना सुद्धा आई व आईचे आपल्या जीवनातील महत्त्व काय ? हे अनेक दृष्टांतातून समजावून दिले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ह .भ. प . सानप गुरुजी नाना श्री क्षेत्र वैष्णव गड , हभप बाबुराव महाराज काळे ताडशिवणी . हभप वाघ गुरुजी संत तुकाराम महाराज बारागाव मंडळ , झोटींगा . हभप केशव महाराज बुधवत अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान वीर पांगरा . हभप शिवाजी महाराज मुंडे पळसखेड चक्का . हभप प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था उगले पांगरी . हभप ज्ञानेश्वर महाराज झगरे वाकतकर . हभप सतीश महाराज डोईफोडे वारकरी शिक्षण संस्था शंकर गड . हभप सारंगधर महाराज टेके अध्यक्ष संत गजानन महाराज संस्थान बीबी . हभप रामेश्वर महाराज नालेगावकर माऊली वारकरी शिक्षण संस्था मंठा . हभप आघाव महाराज पळसखेड चक्का . हभप रमेश महाराज जायभाये .श्री क्षेत्र वैष्णव गड . हभप तेजराव महाराज बुरकुल श्रीक्षेत्र वैष्णव गड हभप अतुल महाराज श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर ह भ प सरकटे महाराज लोणार .ह भ प वैभव महाराज श्रीक्षेत्र आळंदी ह भ प अनिल महाराज शिंगणे शेदुर्जन . हभप दत्ता महाराज ढवळे लोणार ह भ प जगन महाराज आढाव लोणार ह भ प विलास महाराज ह भ.प.भगवान महाराज शिंदे.डोरवीकर.रोशन गावकर .माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब . परळी येथील उद्योजक श्री सुरेश आण्णा टाक .तसेच राजकीय सामाजिक अध्यात्मिक वैद्यकीय शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. माता बहिणी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होत्या .सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.