pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

व्यवसाय शिक्षण प्रचाराच्या “स्किल ऑन व्हील्स” व्हॅन प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते उद्घाटन

0 1 1 8 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.17

व्यवसाय शिक्षण प्रचारासाठी जालना शहरात दाखल झालेल्या “स्किल ऑन व्हील्स” प्रदर्शन व्हॅनचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. प्रदर्शनास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा परिषदेच्या परिसरात हे व्हॅन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिक्षण अधिकारी कैलास दातखिळे व मंगला धुपे, लेंड-अ-हँड-इंडियाचे जिल्हा समन्वयक मीनाक्षी आतकुलवार, अंकित देशमुख, क्रांतीदीप कांबळे, तुषार कुचेकर यांच्यासह नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना कृतीशील, व्यावसायिक आणि जीवन कौशल्ययुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना कसे देता येईल, याचा विचार केंद्र व राज्य शासन प्रामुख्याने कार्य करीत आहे. त्याअनुषंगाने लेंड-अ-हँड-इंडिया यांच्यामार्फत व्यवसाय शिक्षण प्रचारासाठी आज “स्किल ऑन व्हील्स” व्हॅन प्रदर्शनाचे जिल्हा परीषद येथे आयोजन करण्यात आले होते
या स्किल ऑन व्हील्स प्रदर्शन व्हॅनद्वारे चालती फिरती प्रयोगशाळा म्हणुन विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत प्रवृत्त करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल, कृषी उद्यानिकी, आरोग्य यासह इतर व्यावसायिक जीवन कौशल्य शिक्षण कसे देता येईल. याचे सुसज्ज व्हॅनच्या माध्यमातुन प्रात्याक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 8