राष्ट्रीय पोषण अभियान 2023 शिवणी येथे संपन्न

बीड/निशिकांत गोरे,दि.15
महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या कडून सुरू झालेले पोषण माह अभियान शिवणी येथे मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाले,कुपोषण दूर करून सदृढ निरोगी बालक निर्माण हेतू झुनझुणू राजस्थान येथून 8 मार्च 2018 रोजी या अभियानाच्या अमलबजावणी संपूर्ण देशात सुरू झाली,गरोदर माता, स्तंनदा माता, किशोरवयीन मुली,बालके यांचे आरोग्य सदृढ करण्यासाठी योग्य आहार लाभार्थ्यंपर्यंत पोहचून एक मोठी लोक चळवळ सुरू करण्यात आली आहे,यांचा फायदा 10 कोटी हून अधिक लाभार्थ्यांना मिळत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प बीड 2 यांच्या वतीने सक्षम भारत सदृढ भारत निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबविले जात आहेत,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुपेकर सर सरपंच यांनी पोषण चळवळ सक्रिय करण्यासाठी आमचे नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले,कार्यक्रमाचे सुरवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्याचे व उपस्थितांचे स्वागत केले,पर्यवेक्षिका श्रीमती एस. ओ. करांडे मॅडम यांनी पोषण माह अभियान रूप रेषा सांगून आहाराचे महत्व पालक व विद्यार्थी,ग्रामस्थ, यांना पटवुन दिले.श्रीमती घोडके मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून शोभा वाढवली,या कार्यक्रमाच्या यशयस्वितेसाठी श्रीमती सोनाली ठोकळ,श्रीमती छाया मिसले,छाया इंगोले, आशा ससाणे, अवसारे यांनी विशेष प्रयत्न केले,रांगोळी , चौरस आहार स्टॉल,कडधान्य, तृणधान्य,पालेभाज्या फळे,पूर्व शालेय शिक्षण साहित्य यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते, बालविवाह प्रतिबंध शपथ पर्यवेक्षिका सुनीता करांडे मॅडम यांनी सर्वांना दिली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.