pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; शाळेत जल्लोष

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी, दि.15

७६वा स्वातंञ्य दिन मोठ्या उत्साहात साजरा चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी बदनापूर संचलीत,जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेतुन गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत भारत माता की जय,जय जवान जय किसान असे घोषणा देत गावातील परीसर दनाणून टाकला.तसेच ध्वजारोहण शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.परमेश्वर गरबडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित शाळेचे सचिव सौ.लताताई गरबडे प्रमुख उपस्थिती होती.तसेच शाळेचे परीसरात वृक्षलागवड करण्यात आली.व तसेच शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपअध्यक्ष व सर्व सद्स गावातील ग्रामपंचायत समिती सर्व आजी माजी सरपंच,उपसंरपच,ग्रामपंचायत समिती सदस्य,गावातील युवा तरूण मिञ मंडळी,वार्ताहार,ग्रामस्थ व पालक गावकरीमंडळी मोठी उपस्थिती होती तसेच शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे व शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थिती आदिची होती.
श्रीमती.एस.आर.कुलकर्णी.,वाय.बी.मदन.,डी.एन.सोनंकाबळे.,पी.पी.नागरे.,श्रीमती.ए.बी.देशपांडे.एल.बी.जाधव.,आर.एस.ठाकरे.,एस.बी.राऊत.,श्रीमती.एम.ए.खरात.उपस्थित होते.तसेच यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थींयांनी वेशभुषा देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली.स्वातंञ दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषन स्पर्धा आणि देशभक्तीपर वेशभुषा स्पर्धेने वेधले.वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंञ्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या.त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहूणे द्वारे च्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रशस्तीपञक वितरित करण्यात आले.यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहूणे शाळेचे संस्थापक अध्यक्ष “लोकनेते” मा.परमेश्वर गरबडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनीय भाषण केले कार्यक्रमांचे संचलन व आभार शाळेचे सांस्कृतीक विभाक प्रमुख वाय.बी.मदन यांनी केले..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4