उमा जाधव ची राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी निवड

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची वर्ग सातवी ची विद्यार्थिनी उमा पंडित जाधव हिने 14 वर्षे वयोगटांमध्ये 39 किलोग्रॅम वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला तिची राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली*
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेली जोगेश्वर वाडी तालुका अंबड येथील तांड्यावर राहणारी मुलगी राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सर्व ग्रामीण स्तरामधून उमाचे अभिनंदन होत आहे तिच्या या यशाबद्दल शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंबड संचलित जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनगाव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब इंगळे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य कैलास मुके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
उमा जाधव हिला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय येळवंते राजेंद्र पाटील संतोष भोजने यांचे मार्गदर्शन लाभले.



